ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फेरीलँड शाळेत जागतिक कर्करोग दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         इंडियन डेंटल असोसिएशन चंद्रपूर तथा फेरीलँड स्कूल भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून स्थानिक फेरीलैंड शाळेत तंबाखू मुक्त शाळा या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा धानोरकर, डॉ. प्रवीण केशवानी, डॉ. मनोज हक्के,डा. पंकज कावळे,डॉ. आकाश कासटवार, डॉ. राजेश टोंगे,डा. पियुष लोडे,डॉ. स्वस्तिक गुंडावर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. आकाश कासटवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कॅन्सर या रोगाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करीत तंबाखू सेवनापासून दूर राहण्यास सांगितले व कॅन्सर रोगाबद्दल आपल्या भाषणाद्वारे जनजागृती केली.

सदर कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद, तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये