Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीच्या आरोपीला वर्धा पोलिसांनी घेतले आपल्या ताब्यात

पोलिस निरीक्षक पराग पोटे यांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 11/12/2023 वेळ 4 ते 4.30 च्या दरम्यान आरोपी नामे मनिष रमेश निर्मलकर वय 22 वर्षे राहणार डॉ जाकीट हुसेन काॅलनी वर्धा यांनी फिर्यादी नामे अरुण गोविंदराव काशीकर वय 71 वर्षे राहणार हिमालय विश्व वर्धा व्यवसाय अरुण तेल गिरणी कच्ची लाईन वर्धा येथे चोरी करून चोरी पसार झाला हि माहिती फिर्यादी यांना मिळाली असतांना त्यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे येऊन तोंडी रिपोर्ट देण्यात आली.

यावेळी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पोलिस निरीक्षक पराग पोटे यांनी डी सी पथकाचे पोलिस हवालदार पंकज भरणे व त्यांचे कर्मचारी यांनी तपासणी करून आरोपी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्या कडून एक मोबाईल आणि दोनशे रुपये जप्त करण्यात आले ही कार्यवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पराग पोटे व पोलिस हवालदार पंकज भरणे ‌पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलिस शिपाई वैभव जाधव श्रावण पवार तसेच सायबर सेलचे कुलदीप ताकसाळे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये