Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नांदा येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – लायन्स आय सेंटर सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर, महावीर इंटरनॅशनल, श्रीमती तारादेवी जुगल किशोर जी गोयल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर रविवार दिनांक २९ डिसेंबर ला दुपारी बारा ते तीन दरम्यान सांस्कृतिक भवन येथनांदा येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराला उद्घटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिलीप भंडारी आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवडलेल्या रुग्णांची निशुल्क कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया दिनांक ३० डिसेंबर रोजी सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रतज्ञ च्या हस्ते करण्यात येईल.

यासाठी निशुल्क बस सेवा जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष व माजी सभापती संजय मुसळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे. त्यांनी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये