Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महसूल विभागाची तोरगाव (बु.) येथील रेती कार्यवाही शंकेच्या भोवऱ्यात!

कार्यवाही करून एक महिना उलटून रेती तस्कर सापडेना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- महसूल विभागाने 30 नोव्हेंबर ला तोरगाव (बु.) परीसरात मोठी कार्यवाही करत वन विभागाच्या जागेतून सुमारे 130 ब्रास रेतीचा साठा पकडला.सदर प्रकरणाला महिना लोटत असताना अद्याप हा रेती साठा करणारा रेती तस्कर कोण? ज्या भागात ही कार्यवाही झाली त्या भागातील महसूल कर्मचाऱ्यावर काय कार्यवाही केली? या सोबत या कार्यवाहीची माहिती अद्याप वनविभागाला नसल्याने या कार्यवाही वर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून शंका व्यक्त केले जात आहे.

 ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे या रेतीची मागणी अधिक असते.अद्याप रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने अनेक रेतीतस्कर सक्रीय झाले असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन सुरू असून वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.रेतीची मागणी लक्षात घेता रेती तस्करांनी काही स्थानिक महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांन सोबत आर्थिक हितसंबंध तयार केल्याची चर्चा असून वैनगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून तोरगाव (बु.), तपाळ बेलगाव, कोलारी परिसरात रेती साठा साठवून दिवस रात्र तस्करी सुरू केली आहे. अशातच तोरगाव (बु.), परिसरात अवैध रेती साठा असल्याची माहिती तहसिलदार ब्रम्हपुरी यांना मिळाली.तहसील विभागाच्या चमूने दिनांक 30 नोव्हेंबर ला कार्यवाही करत वन विभागाच्या जागेतून 130 ब्रास रेती साठा जप्त केला व सदर रेती साठा ट्रक,ट्रॅक्टरच्या साह्याने नवीन तहसील कार्यालयाचे मागचे परिसरात आणून ठेवण्यात आला आहे.

    तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा जप्त झाल्याने तालुक्यातील वैनगंगा नदी पत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुक्यात रेती साठा जप्त केल्याची मोठी कार्यवाही असताना सुध्दा तहसील कार्यालयाकडून प्रेस नोट काढून प्रसार माध्यमांना बातमी न देता मध्यस्थ व्यक्तीकडून बातमी तयार करून प्रसार माध्यमांना देण्यात आली. सदर कार्यवाही मध्ये फक्त दोन ट्रॅक्टर वर कार्यवाही केल्याची माहिती आहे.

कोणत्या नंबर च्या ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यात आली या बद्दलची माहिती महसूल विभागाकडून देण्यास नेहमी टाळाटाळ केली जाते. ट्रॅक्टर चालक व मालकावर किती दंडाची कारवाई झाली व त्याच्यावर अवैध गौण खनिज चोरी बद्दल पोलीस कार्यवाही का करण्यात आली नाही? वन विभागाच्या जागेवर असलेला अवैध रेती साठा वर कार्यवाही करताना वन विभागाला वेळीच माहिती का देण्यात आली नाही.कार्यवाहीला महिनाभराचा कालावधी होऊन सुध्दा या प्रकरणातील मुख्य रेती तस्कर कोण याची महसूल विभागा कडे माहिती नसल्याने या कार्यवाही वर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये