Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या खेळाडूंचे सुयश

सात सुवर्ण तर पाच रजत पदके प्राप्त : देशभरातील 1500 खेळाडूंनी घेतला सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

औरंगाबाद येथे पार पडलेल्या आठव्या फा-हियान राष्ट्रीय ओपन कराटे कप 2024 या स्पर्धेत शहरातील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सात सुवर्ण तर पाच रजत पदके प्राप्त केली आहे.

सदर स्पर्धेत देशभरातील 1500 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. साची चावरे हिने मुलींच्या 10 व 11 वयोगटांमध्ये फाईट व काता या प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली, नैताकी बनपुरकर याने मुलांच्या दहा व अकरा वयोगटांमध्ये फाईट व काता या प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली. जिया घोडे हिने मुलींच्या बारा व तेरा या वयोगटात फाईट व काता प्रकारात एक सुवर्ण व एक रजत पदक प्राप्त केले.

सोनाक्षी कोंडस्कर हिने मुलींच्या अकरा व बारा वयोगटात फाईट व काता प्रकारात एक सुवर्ण तर एक रजत पदक प्राप्त केले. शोर्धाज राज याने मुलांच्या अकरा व बारा या वयोगटात फाईट व काता या प्रकारात एक सुवर्ण व एक रजत पदक प्राप्त केले. तर साक्षी कपाट हिने मुलींच्या 9 व 10 वयोगटात फाईट व काता या प्रकारात दोन रजत पदके प्राप्त केले.

सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय राकेश दीप, शितल तेलंग, अशी आशीष रीगने, संदीप चावरे, पिंटू मरस्कोल्हे, दामिनी सूर्यवंशी व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. यश प्राप्त केल्याबद्दल सदर खेळाडूंचे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये