Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

“अल्पसंख्यांक हक्क दिवस” साजरा

राष्ट्रगीताचे गायन करुन सदर कार्यक्रमाचा समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. उपसचिव, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत निर्गमित शासन परिपत्रक क्रमांकः अििव २०२३/प्र.क्र. ४२/का.८ दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ नुसार दिनांक १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो.

त्याअनुषंगाने नगर परिषद कार्यालय वर्धा येथील श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे दिनांक १८/१२/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता अल्पसंख्यांक हक्क दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे तथा मार्गदशक म्हणून मा. अधिवक्ता वसीम मिर्झा वेग उपस्थित होते. नगर परिषद कार्यालय वर्धा येथील मुख्याधिकारी राजेश भगत, उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे, कार्यालय अधिक्षक कु. पूजा धर्माळे, एनयुएलम व्यवस्थापक श्रीमती चित्रा चाफले, आस्थापना लिपीक श्री. अक्षय पुनवटकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच नगर परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील अल्पसंख्यांक समाजातील महिला मोठ्या प्रमाणात हजर होत्या.

 राजेश भगत, मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व मा. अधिवक्ता वसीम मिर्झा बेग यांनी अल्पसंख्याकांच्या कायदेशीर हक्काबाबत व भारतीय संविधानामध्ये असलेल्या अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोटघरे, उपमुख्याधिकारी यांनी केले. राष्ट्रगीताचे गायन करुन सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये