Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मदनी गावातील चौकात नाकेबंदी करून 6 लाख 10 हजारावर दारूचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 19.12.2024 रोजी रात्र दरम्यान उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना गोपनिय माहीती मिळाली की, रविन्द्र चौहान रा. धोत्रा ता.जि. वर्धा व त्याचा मित्र असे त्यांचे ताब्यातील एका टाटा कपंनीची इंडीगो पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन क्र एम.एच 29 आर 5267 हीने विदेशी दारूचा माल नागपुर जिल्हयातुन पो.स्टे. सेवाग्राम हददीतील मदनी चौका कडुन धोत्रा येथे घेवुन जानार आहे. अशी माहीती मिळुन आल्याने पंच व पोलीस स्टॉफ सह पो.स्टे. सेवाग्राम हददीतील मदनी गावातील चौकात नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावर यातील आरोपी नामे 1) रविन्द्र किसन चौहान वय 30 वर्ष रा. वार्ड न. 1. धोत्रा ता.जि. वर्धा 2) प्रेम ज्ञानेश्वर पवार वय 24 वर्ष रा. शिवाजी नगर राळेगांव जि यवतमाळ ह.मु. वार्ड न. 1. धोत्रा ता.जि. कर्ता यांचे हे विदेशी दारूचा माल वाहतुक करीत असतांना मिळुन आला त्यांचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती टाटा कपंनीची इंडीगो सी.एस. पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन क्र एम.एच 29 आर 5267 2) 7 खरडयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 336 सिलबंद शिश्या ३) एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल असा एकुन जु. कि. 6,10,800/- रू चा माल अवैध्यरित्या विनापास परवाना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे आरोपीतांविरुध्द 1) अपराध क्रमांक 961/2024 कलम 65 अ ई. 77 अ. 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181 मो.वा.का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सेवाग्राम येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वो, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खाँन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, व मुख्य. युवा कार्य प्रशि योजना मधील चैतन्य धनविज यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये