ताज्या घडामोडी

जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे आयोजित सिकलसेल निदान शिबिर संपन्न – नगर पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची तपासणी

150 विद्यार्थ्यांची केली तपासणी 6 विद्यार्थी सिकलसेल ग्रस्त असल्याचे निदान

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

आघाडीची समाजसेवी संस्था म्हणुन परिचित असलेल्या जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे शहरातील नगर पालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत सिकलसेल निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथिल प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ शुभांगी पुरटकर ह्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.

ह्या शिबिरात जवळपास 150 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 6 विद्यार्थी सिकलसेल ह्या व्याधीने ग्रस्त असल्याचे आढळून आले असुन त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात माहिती देण्यात आली तसेच सर्व बाधित सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे पुढील उपचारांसाठी नोंदणीकृत करण्यात आले असुन रुग्णालयाच्या माध्यमातून शासन योजनेप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत हे विशेष.

जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांच्या संकल्पनेतून ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर कार्यक्रम संयोजिका म्हणुन राधा धनपावाडे ह्यांनी संपुर्ण शिबिराचे नियोजन केले. भारताची भावी पिढी सुदृढ असावी आणि दुर्दैवाने कुणालाही  असलेल्या तसेच आनुवंशिक समजल्या जाणाऱ्या सिकलसेल सारख्या गंभीर आजारावर उपचार मिळावे ह्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी व्हावी ह्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय राजुरा रॉयल्सच्या सदस्या पुजा बानकर, संतोषी आत्राम, जयश्री शेंडे, अनुष्का रैच, शुभांगी वाटेकर, नम्रता खोंड, श्वेता अपराजित, पूजा घरोटे ह्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका निवेदिता पातुरकर, तसेच आभार प्रदर्शन मंजूषा येरणे यांनी केले. अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांनी कार्यक्रम आयोजनासाठी सक्रिय सहकार्य केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये