Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्रम,शिस्त,सखोल वाचन आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग – डॉ. नारायण शर्मा

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे एक दिवसीय करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर- विद्यार्थ्यांनी जीवनात कठोर परिश्रम घेत शिस्त आणि सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी सुद्धा विज्ञान विषयातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील व मराठी शाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला तर यशाची शिखरे आपण सहज गाठू शकाल.असे प्रतिपादन,” एक दिवसीय विज्ञान विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिरात”मार्गदर्शन करताना डॉ. नारायण शर्मा सर(संचालक-शारदा कोचिंग क्लासेस,नागपूर)यांनी केले.

    सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे NEET, JEE, MHTCET, B.Sc.nursing,NDA यासारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून निवड होण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन डॉ. शर्मा सर यांनी केले. अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी ,11वी,12वी च्या टेक्स्ट बुक्सचे सखोल वाचन करून ज्ञान अद्ययावत ठेवावे. टेक्स्ट बुकातील सर्वच छोटे,मोठे विविध रंगांचे बॉक्सेस काळजीपूर्वक वाचावे असे विचार मांडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री महेंद ताकसांडे सर उपस्थित होते.त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करून कॉलेज चे नाव रोशन करावे असे विचार मांडले .कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले साहेब उपस्थित होते.त्यांनी प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून यश संपादित केले तर आई-वडिलांचे,सोबतच महाविद्यालयाचे ही नाव रोशन होते.प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.प्रशांत खैरे सर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कु. सोज्वल ताकसांडे यांनी तर आभार प्रा.अनिल मेहरकुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शिल्पा ताजने,स्नेहल चांदेकर,करण लोणारे, प्रा.नितीन सुरपाम,प्रा.राजेश बोळे सर व विद्यार्थी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये