Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देवघाट गणेश मोड जवळ बस दुचाकी अपघात

एकाचा घटनास्थळी मृत्यू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा आदिलाबाद चंद्रपूर महामार्गावर कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीत देवाघाट जवळ चार च्या सुमारास एस टी बस नं.MH 40 BL3976 चंद्रपूर आगार व दुचाकी नं.MH 34 BM 4601 मध्ये धडक होऊन अपघात झाला.या अपघातात दुचाकी स्वार रमेश आनंदराव मडावी रा.कन्हाळगाव वय 55 वर्ष याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

बस ही चंद्रपूर कडे जात होती मयत रमेश हा देवघाट दत्त यात्रेला आला होता परत आपल्या स्वगावी जात असताना अपघात घडला कोरपणा पोलीस पथक देवानंद केकण पोलीस उपनिरीक्षक याच्या मार्गदर्शनात पो.ह.नैताम, पोह आडे,पोह जाधव पोशी बिबिशन खटके यांनी क्षणाचाही विलंब नकरता घटना स्थळ गाढून अपघाटग्रस्त रमेश यांना ग्रामीण रुग्णालंय येथे नेले मात्र डॉक्टर यांनी मृत्यू घोषित केला.

देवघाट येथे दत्त जयंती निमित्य तीन दिवस यात्रा सुरु झाली आणी पहिल्याच दिवाशी अपघात झालाने यात्रेला गालबोट लागल्याची चर्चेला परिसरात बोलले जात आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजपूत याच्या मार्गदर्शनात कोरपणा पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये