ताज्या घडामोडी

मुसळधार पावसाने कोसळली भिंत

सुदैवाने जीवित हानी टाळली

चांदा ब्लास्ट :नंदु गुड्डेवार

ब्रम्हपुरी:-
आठवड्यापासून पडत असलेल्या सततधार पावसाने ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील श्रावण कांबळी यांच्या घराची भिंत दि.21 जुलै ला मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली असून यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.मात्र यात कांबळी परिवाराचे हजरोंचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात अधून मधून मुसळधार ते अतिमूसळधार पावसाने मागील आठवड्यापासून थैमान घातले आहे. त्यात नदी नाले तुडुंब वाहत आहेत.तर कित्येकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले होते.मात्र 21 जुलै च्या मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने रात्री गाड झोपेत असलेले अर्हेरनवरगाव येथील कांबळी परिवार घर कोसळण्याच्या आवाजाने जागे झाले त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र त्यांचे हजरोंचे नुकसान झाले असल्याने शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये