Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एफ. ई. एस. गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे मिस एफ. ई. एस. – 2024 स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित एफ. ई. एस. गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयात 2024-25 या सत्रातील विद्यार्थिनीचा क्रीडा सप्ताह तथा नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साह तथा मनोरंजक वातावरणात संपन्न झाला. विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सर्व विद्यार्थिनींचे आकर्षण असलेली मिस एफ. ई. एस. सुंदरी 2024 ही स्पर्धा सर्वांचे लक्ष वेधक ठरली.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष मा. अॅड.  विजयरावजी मोगरे सर, सचिव मा. अॅड. पुरुषोत्तमजी सातपुते सर, स्मिता मोगरे, अल्का सातपुते, खोब्रागडे मॅडम, प्राचार्या गीता महेशकर मॅडम, माजी प्राचार्या संगीता बुटले मॅडम, उपप्राचार्य मिलिंद जीझिलवार सर, पालक सदस्य येरणे साहेब मंचावर स्थानापन्न होते.

कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना स्पर्धेच्या युगात विद्यार्थिनींना आपल्या अवांतर कलागुणांना वाव मिळावा किंबहुना आपल्या कॉलेजमध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना या स्पर्धेची माहिती आणि त्या क्षेत्रातील करिअरच्या संधीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने माननीय संचालक मंडळाच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा उत्तरोत्तर फार लोकप्रिय झालेली आहे.

या स्पर्धेत एकूण 23 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून स्पर्धेच्या विविध कसोट्या पार पाडून मिस एफ. ई .एस.2024 ची कु. अमिषा विलास पेटकर वर्ग १श्वा सायन्स ही विद्यार्थिनी विजेती ठरली तर फर्स्ट रनर-अप कु. अनुष्का अनिल उमरे वर्ग १२ कला व सेकंड रनर-अप कु. अनुष्का नरेंद्र चहारे वर्ग ११वा कॉमर्स इंग्लिश या विद्यार्थिनीने अनुक्रमे द्वितीय तथा तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून कु. समीक्षा बद्दलवार व स्मिता चावडा मॅडम यांनी उत्कृष्ट परीक्षण केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. धनश्री चिताडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुधीर खडके यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता समस्त प्राध्यापक तथा प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थिनी तथा पालक वर्ग उपस्थित होते व अतिशय हर्षोउल्हासात कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये