Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सिंदखेड राजा मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आ. मनोज कायंदे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  सिंदखेड राजा मतदार संघात तीन दशकापासून शहरासह ग्रामीण भागात विकास कामांचा जो अनुशेष आहे तो पूर्णपणे भरून काढणार त्यासाठी ब्लू प्रिंट तयार करत आहे मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे,असे आमदार मनोज कायंदे यांनी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी आयोजित सत्कार समारंभात दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बोलत होते.

  सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात स्थानिक प्रस्थापितांना धक्का देत मनोज कायंदे यांनी विजयश्री खेचून आणली मा जिजाऊ च्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मतदार संघात देऊळगाव राजा येथे विदर्भातील प्रसिद्ध असे बालाजी देवस्थान, सिंदखेडराजा येथे मा जिजाऊ चे माहेरघर,मेव्हणा राजा येथे संत चोखामेळा यांच्या स्मृतीने पावन अशा भूमीचा विकास होणे क्रमप्राप्त असताना मतदार संघात आजही ग्रामीण भागात विविध समस्यांनी ग्रासलेले आहेत. या सर्व विकासापासून वंचित कामांची ब्ल्यू प्रिंट तयार होत असून बोलणार कमी काम जास्त करणार. या सोबतच कसल्याही प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता समाजातील वंचित घटकापर्यंत विकास कसा पोहोचवता येईल याची काळजी घेतल्या जाईल त्यासाठी पक्षीय तसेच जातीपातीचे राजकारण न करता विकासाचा एकच ध्यास हा मनी असून जनतेच्या मनातील विकसनशील इच्छा कशाप्रकारे पूर्ण होतील याचा मी सदोदित प्रयत्न करीन असे उद्गार सिंदखेड राजा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी मतदार संघातील भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गणेश मांटे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी आणि इतर मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी प्रामुख्याने. माजी खासदार सुखदेव काळे,माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नंदाताई कायंदे , आमदार पत्नी सौ वर्षा कायंदे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, यादवराव भालेराव, विष्णू मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कामे करणार आहोत. असे त्यांनी सांगितले,अॅड. काझी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. महायुतीच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांगीण विकास हा एकच अजेंडा ठेवून काम करण्याचे आश्वासन एडवोकेट काझी यांनी दिले कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपाचे डॉक्टर सुनील कायंदे,संजय तिडके, धर्मराज हनुमंते, निशिकांत भावसार, विकास डोईफोडे, लोकेश डोणगावकर, नितीन देशमुख, एडवोकेट सचिन आंधळे, सुरज हनुमंते, संतोष डोईफोडे आधी सह मतदार संघातील शेकडो भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये