भद्रावती शहरात होणारा ब्लास्टिंग चा आवाज आहे तरी कुठला ?
शहरातील घरे हालत असल्याने नागरिक भयभीत : तालुका प्रशासन अन्नभिन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे
भद्रावती शहरात दररोज पहाटे ९.१५ वाजताच्या दरम्यान मोठ मोठे ब्लास्ट झाल्याचा आवाज येतो व घराला हादरे बसतात असा प्रकार गेल्या दहा दिवसापासून भद्रावतीकर अनुभवत आहे. मात्र याबाबत तहसीलदार व ठाणेदार यांनी सुद्धा हा आवाज अनुभवला आहे. हा ब्लास्ट कोणत्या कंपनीतून होत आहे याबाबत प्रशासन अन्नभिन्न असल्याने हा प्रकारामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहे.
तालुक्याच्या सभोताल वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणी, कर्नाटक एम्टा खुली कोळसा खाण, अरबिंदो खुली कोळसा खान आहे. कोळसा भुकलनासाठी ब्लास्टिंग चा उपयोग केला जातो मात्र या ब्लास्टिंगचे काही नियम आहे आणि त्या नियमाचे पालन करून अशी ब्लास्टिंग केली जाते मात्र शहरातील नागरिकांमध्ये खुल्या कोळसा खाणीमध्ये ब्लास्टिंग होत असल्या बाबत तसेच आयुध निर्माणी येथील कालावधी गेलेले बॉम्ब निकामी करत असल्या मुळे हा ब्लास्ट होत असल्याची चर्चा आहे मात्र सतत दहा दिवसापासून पहाटे ९ . १५ ला ब्लास्टिंग होत आहे त्यामुळे घरातील दार , खिडक्या हलतात घरातील भांडे पडतात व भला मोठा आवाज ऐकू येतो त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे हा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असुन आयुध निर्माणी येथुनच हा ब्लास्टिंग चा आवाज येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
[शहरात गौतम नगर, मल्हारी बाब सोसायटी, खापरी, सुमठाणा, गुरुनगर, पंचशील नगर, चंडिका वार्ड तसेच चालबर्डी, निंबाळा, घोट व चपराळा या काही गावात ब्लास्टिंगचा मोठा आवाज पहाटे येतो या भागातील घरे सुद्धा हलत असल्याची प्रत्यक्ष दर्शी नागरीकांनी सांगितले]
[सतत होणाऱ्या ब्लास्टिंग प्रकरणात तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याशी याबाबत विचारणा केली असता त्यांनी सुद्धा हा आवाजअनुभवला असल्याचे सांगितले मात्र याबाबत कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले या प्रकाराबाबत आयुध निर्माणी प्रबंधकाशी विचारणा केली मात्र त्यांनी आधुध निर्माणी मध्ये ब्लास्ट करण्याचा कुठलाही प्रकार चालू नसण्याचे सांगितले.]
[ ठाणेदार अमोल काचोरे यांना सुद्धा या प्रकाराबाबत विचारणा केली मात्र त्यांनी सुद्धा याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले]
[खुल्या कोळसा खाणीत कोळसा भूकलनासाठी ब्लास्टिंग चा वापर केला जातो मात्र या प्रकाराबाबत मी खाजगी खाणीत प्रत्यक्ष माहिती काढली असता या खाणीत ब्लास्टिंग होत नसल्याचे सांगण्यात आल. मी पण एक खुल्या कोळसा खाणीत काम करतो कोळसा खानीत ब्लास्टिंग करण्याची वेळापत्रक असते सूर्य निघाल्यानंतर ब्लास्टिंग केली जात नाही ते भी इतक्या भयंकर तीव्रतेची ब्लास्टिंग होत नाही पण शहरात होणाऱ्या ही ब्लास्टिंग नेमकी कुठून होत आहे याचा प्रशासनाने शोध घ्यावा.
राजू डोंग
खान कामगार तथा उपसरपंच चेक बरांज ग्रामपंचायत