Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ॲग्रो व्हिजन,नागपूरमध्ये अंजली आणि दिपाली श्रीपत राठोड यांचे ‘ परसबाग असावी दारी,या विषयावर सलग तिसऱ्या वर्षी सादरीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मध्य भारतातील सर्वात मोठा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘ऍग्रो व्हिजन’ हा भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम दरवर्षी नवीन संकल्पनेसह शेतकऱ्यांना फायदेशीर, शेतीसाठी नव नवीन प्रयोग आणि फायदेशीर तंत्रज्ञानाबद्दल प्रबोधन करण्यासाठी नागपुरात आयोजित केला जातो.

गेल्या दोन वर्षांपासून ‘वसंतराव नाईक परसबाग’चे निर्माते असलेले नागपूरचे राठोड कुटुंब तज्ज्ञ वक्ते म्हणून ॲग्रो व्हिजनमध्ये सादर करत आहेत.यावर्षी,23 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना ॲग्रो व्हिजन फाऊंडेशनने आमंत्रित केले होते. त्यांचा विषय “परसबाग असावी दारी, सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतींनी,आरोग्यदायी परसबाग, टेरेस गार्डनिंग निर्मिती करणे हा आहे.श्रीपत राठोड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

शहरी आणि ग्रामिण भागातील जनतेच्या आरोग्याची सद्यस्थिती आणि आरोग्य कसे असावे याबाबत त्यांनी सांगितले.पुढे, कु.अंजली श्रीपत राठोड आणि कु. दिपाली श्रीपत राठोड यांनी आरोग्यसंपन्न कुंटूब -आरोग्यसंपन्न राष्ट्र निर्मिती या उद्देशाला डोळ्यांसमोर ठेवून ‘परसबाग असावी दारी., या विषयांवर अनुभवपूर्ण सादरीकरण केले.शेवटी श्रीपत राठोड लिखीत आणि सौ. जयश्रीताई राठोड यांच्या आवाजातील ” परसबाग निर्माण गीत., गाण्याने सादरीकरणाची सांगता करण्यात आली.शेवटी त्यांचा कु. दिपाली व कु. अंजली श्रीपत राठोड यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये