आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माधुरी कटकोजवार ने एम.ए.हिंदी मध्ये प्रथम मेरीट येत मिळविले गोल्ड मेडल

चांदा ब्लास्ट

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या दहाव्या दिक्षांत समारंभात एम.ए.हिंदी विषयांत सिजिपीए ९.९४ आउट ऑफ १० असे यश मिळवित विद्यापीठातून प्रथम मेरीट व गोल्ड मेड्यालिस्ट ठरल्या ने माधुरी दीपक कटकोजवार हिला ५जुलै ला महामहीम राष्ट्रपतीजींची उपस्थिती लाभलेल्या कार्यक्रमात कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठाच्या वतीने पदवी, मेरीट प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देवुन सन्मानित करण्यात आले. या यशाकरीता माधुरी कटकोजवार ने सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सुदर्शन निमकर, हर्षवर्धन दीक्षित सरदार पटेल महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर, उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार, हिंदी विभाग प्रमुख डॉ सुनिता बन्सोड, शैलेन्द्रकुमार शुक्ल या मान्यवरांप्रती आभार व्यक्त केले आहे. सन २०२०-२१ मध्ये पहिल्यांदा माधुरी कटकोजवार ने मास कम्युनिकेशन ची मास्टर डिग्री प्राप्त केली तेव्हा सुध्दा तिने मेरीट यादीत तृतीय स्थान मिळविले होते. यावेळी डबल एम.ए. हिंदी मध्ये गोल्ड मेड्यालिस्ट व प्रथम मेरीट ठरल्यामुळे तिचे मित्रमंडळी व शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक केल्या जात असुन तिची प्रशंसा केली जात असुन तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये