Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शालेय साहित्यांचा वाटप करत केला स्वतःचा वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

मागील 10 वर्षांपासून क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, शैक्षणिक, सांस्कृतिक, अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी पूर्व विदर्भातील नावाजलेली सामाजिक संस्था, म्हणजेच “न्यू लाईफ बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरी” ह्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा कुमारी.पुनम नानाजी कुथे, यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आज दि. 09/12/2024 रोजी सोमवारला ब्रम्हपुरी शहरातील विद्यानगर येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेला, संस्थेच्या सहकारी सदस्यांसोबत भेट देऊन वाढदिवस साजरा केला.. तेथील शालेय विद्यार्थ्यांशी प्रेमळ हितगुज साधून, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पुनम कुथे यांनी नोटबूक, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर इत्यादी शालेय उपयोगी वस्तूंचा वाटप केला. हे सर्व पाहता, तेथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय निरागस व आनंदमय वातावरण निर्माण झाला, व तेथील सर्व विद्यार्थ्यांनी पुनम कुथे यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत त्यांचे विशेष आभार मानले.

या उल्लेखनीय उपक्रमाच्यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.उदयकुमार पगाडे, सदस्य श्री.प्रशांत खोब्रागडे, श्री.रितेश ढोंगे, तसेच श्री.शेबे सर, शिवणकर सर, चौधरी सर, वल्लारवार मॅडम, चौधरी मॅडम, कापगते मॅडम, इत्यादी कर्मचारीवृंद व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

एक महत्त्वाची बाब म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून “न्यु लाईफ बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरी”., ह्या संस्थेच्या प्रत्येक सदस्यांचे वाढदिवस दरवर्षी समाजपयोगी उपक्रम राबवित साजरे केले जातात. ह्यांचे नावीन्यपूर्ण उपक्रम बघता, अनेकांना सामाजिक कार्य करण्यास विशेष प्रेरणा मिळतो.

आजच्या २१व्या शतकातील युवकांनी स्वतःच्या वाढदिवसाला विनाकारण अतोनात पैशांची उधाळ करत, वाईट सेवन करत साजरा करण्यापेक्षा., आपल्या जवळपासच्या गरजू लोकांना मदत करावे, किंवा समाजपयोगी उपक्रम राबवीत स्वतःचा व इतरांचा वाढदिवस साजरा करावा, हेच सांगावीस वाटते.

कुमारी.पुनम नानाजी कुथे

(अध्यक्षा – न्यु लाईफ बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरी)

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये