ताज्या घडामोडी

सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदारांचा थंड प्रतिसाद

जिल्हाधिकाऱ्यांसह उच्च अधिकारी व नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या मतदानाला 20 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असुन चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानास थंड प्रतिसाद असल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट दिसत असुन जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सकाळीच मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून नागरिक हक्काचा वापर केल्याचे कळत आहे.

निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसभा क्षेत्र निहाय मतदानाची आकडेवारी जाहीर केली असुन जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान 74-चिमूर मतदार संघात झाले असुन सर्वात कमी मतदान शहरी क्षेत्र असलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयात म्हणजेच 71- चंद्रपूर विधानसभा मतदार संघात झाले आहे. शहरी क्षेत्रातील मतदार अजुनही मतदानासाठी बाहेर पडला नाही ही चिंतनीय बाब असुन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारांनी मतदान करून ग्रामीण मतदारांपुढे आदर्श निर्माण करावा ही अपेक्षा कायम राहते की फोल ठरते हे काही वेळात स्पष्ट होणार आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय मतदान 👇

70 – राजुरा विधानसभा क्षेत्र             –    8.78%

71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र             –    4.78%

72 – बल्लारपूर विधानसभा क्षेत्र        –    8.82%

73 – ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र           –    9.26%

74 – चिमूर विधानसभा क्षेत्र              –  10.26%

75 – वरोरा विधानसभा क्षेत्र              –    7.29%

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये