ताज्या घडामोडी

पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी घेतला पोलीस बंदोबस्ताचा आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जिल्ह्यातील चारही मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देऊन पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात 310, देवळी 335, हिंगणघाट 351 व वर्धा विधानसभा मतदार संघात 346 मतदान केंद्र असे एकुण 1342 मतदान केंद्र असून याठिकाणी उद्या बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया निर्भिड आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

आज पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना केल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे विशेष लक्ष देऊन मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पोलिसांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदान करतांना मतदार कक्षात मोबाईल वापरण्यास बंदी असून या प्रकारचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलिसांना दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये