ताज्या घडामोडी

विधानसभा निवडणुक संदर्भात मा. संजयजी सिंग विदर्भ दौऱ्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक संदर्भात काल आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय वक्ता व राष्ट्रीय नेता आणि राज्यसभा खासदार माननीय श्री संजयजी सिंग हे काल विदर्भ दौऱ्यावर नागपुर नगरीत आले असता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रचारासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्या करीता सर्व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांना प्रचार करण्या साठी आव्हान केले. विदर्भात आम आदमी पार्टीचे काही पदाधिकारी यांनी अपक्ष उमेदवारांना जाहीरपणे पाठिंबा दर्शवला परंतु आम आदमी पार्टी कडुण अपक्ष उमेदवारा करीता कसलाही पाठिंबा नाही.

या संदर्भात संजयजी सिंग यांनी असं भाष्य केलं की आम आदमी पार्टी ही इंडिया युती (शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना, व काँग्रेस )सोबत व महाराष्ट्रात महाविकास आघाडी सोबत घटक पक्ष म्हणून पुर्ण ताकतीनिशी आम आदमी पार्टी उभी आहे.

 ज्या कोणी आम आदमी पार्टी च्या लोकांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दर्शवला व दिला हे त्यांचे वैयक्तिक असून आम आदमी पार्टी कडून अपक्ष उमेदवारा करीता कुठलाही अधिकृतपणे पाठिंबा दर्शविलेला नाही. व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री धनंजयजी शिंदे यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरला असेल तर त्यांचे पार्टीचे सभासदत्व रद्दचे पत्रक सुद्धा प्रकाशित केले.

ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला तो व्यक्तिश: व स्वत: च्या स्वार्था साठी असून त्यांच्यावर पार्टी लवकरच कारवाई करणार आहेत.

 आज महाराष्ट्राचे निवडणुक प्रचार संदर्भात जे काही होत आहे.यावर संजयजी सिंग यांनी भाष्य असे केले की हा लढा, एका विचाराशी असून जातीयवादी भाष्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे.असे काल संजयजी सिंग यांनी बोलताना सांगितले यावेळेस विदर्भ नेते देवेंद्रजी वानखेडे, विदर्भ संघटन मंत्री भूषणजी ढाकुलकर, वर्धा जिल्ह्याचे माजी संयोजक पंकजजी सत्यकार, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष भाऊरावजी कोटकर, हिंगणघाट विधानसभा आम आदमी पार्टीचे नेते अनिलजी जवादे, वर्धा जिल्हा संघटक मंत्री शुध्दोधनजी मेंढे व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये