ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी विधानसभा निवडणुकी संबंधाने वर्धा शहर डी. बी. पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहर डी बी पथक पोस्ट वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे करता पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर मार्फत खात्रीशीर खबर मिळाली की, इतवारा बाजार बुरड मोहल्ला,वर्धा येथे राहणारा दारू विक्रेता शाहरुख बेग हा त्याचे राहते घरी विदेशी दारू बाळगून तिची चोरून लपून विक्री करीत आहे.

अशा माहितीवरून त्याच्यावर धाड टाकून त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घराचे घर झडतीत वेगवेगळ्या कंपनीची 55 प्रकारचा विदेशी दारू माल कि 2,42,200 रुपये तसेच दोन फ्रिज किंमत 30,000 रुपये, एक मोबाईल कि 10,000 रुपये असा जुमला किंमत 2,62,200/रुपये चा माल मिळून आला.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, परिविक्षादिन पोलीस उपाधीक्षक श्रीमती प्रतीक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनात माननीय ठाणेदार पराग पोटे साहेब यांच्या प्रत्यक्ष हजरीत पीएसआय शैलेश जगताप, पोहावा शैलेश चापलेकर, किशोर पाटील,प्रशांत वंजारी, विजय पंचटिके,पोलीस नाईक पवन लव्हाळे, नरेंद्र कांबळे,पोलीस शिपाई नंदू धुर्वे, शिवा डोईफोडे, श्रावण पवार, समीर खोब्रागडे, वैभव जाधव सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये