ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा शहराच्या सांडपाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरवासीयांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या या बैठकीत, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, कोराडी नाल्याचे बांधकाम, तसेच पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत शहरातील सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी तांत्रिक पर्याय, आवश्यक निधीची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनावर विचारमंथन झाले. शहरातील शेतकरी आणि त्यांच्या शेतमालाच्या संरक्षणासाठी कोराडी नाल्याचे बांधकाम त्वरित करणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. तसेच शहरापासून २ रे ३ किमी पर्यंत सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी.

शहरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी वेगळे करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन संयुक्त निचरा आराखड्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून भविष्यात अशा समस्या उद्भवणार नाहीत. तसेच, अनेक वर्षांपासून रखडलेल्या बाबुळ पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याबाबतही चर्चा झाली.

या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी जताळे, तहसीलदार योगेश काटकर, वरोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळके यांच्यासह वरोरा माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, माजी नगरसेवक राजु महाजन,अजिंक्य तांबळे, अभय लोहे, गजानन मेश्राम, अनिल झोटिंग आणि श्री. निलेश भालेराव उपस्थित होते. या बैठकीमुळे वरोरा शहरातील पायाभूत समस्यांवर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सांडपाण्याच्या समस्यांचे संदर्भात संयुक्त समितीने दौरा करून हि समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा याना दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये