ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्व नोडल अधिकारीची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज मतदारसंघातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा करून मा. खडसे यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्य कशी पार पाडली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येक सेल च्या नोडल अधिकाऱ्यांना काही समस्या आहेत का हे जाणून घेतले तसेच असलेल्या समस्यांना कशा पद्धतीने सोडवले पाहिजे याबद्दल सांगितले.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली, टपाली मतपत्रिका, इव्हीएम शी संबंधित बाबींची योग्य काळजी घेऊन त्यात कसलीही चूक होऊ नये याबद्दल सूचना देण्यात आल्या.

मा. खडसे यांनी निवडणुकीसंदर्भात सर्व नोडल अधिकाऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले तसेच निवडणुक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महत्वाच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

आजच्या सभेला मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी सिंदखेड राजा मुकेश माहोर, मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा प्रशांत व्हटकर, मा. निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव,मा. निवडणूक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा अस्मा मुजावर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, प्र. नायब तहसीलदार नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के प्रकाश शिंदे, संजय सोनुने महसुल सहाय्यक तसेच इतर सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये