ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

56 रक्तदात्यांनी केले रक्तदान : स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          विठ्ठल हनवते मित्रपरिवार, बिरसा मुंडा आदिवासी पुरूष गट तथा शौर्य क्रीडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ रोज बुधवार ला गावातील गुरुदेव प्रार्थना मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले समाजाप्रती कर्तव्य बजावले. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलीस पाटील समीर खान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती गायकवाड, अनिल चौधरी, नागोराव ठावरी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रारंभी सकाळी परीसरात श्रमदान करुन परीसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सदर शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील वैद्यकीय पथकाने सहकार्य केले.यावेळी डा. अमीत प्रेमचंद यांनी रक्तदानाविषयी मार्गदर्शन करुन उपस्थितांना रक्तदानाचे महत्व समजाऊन सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन गणेश हनवते यांनी तर आभार देविदास चौके यांनी मानले. शिबिराला यशस्वी करण्यासाठी शिवम भोसकर, देविदास चौके, राहुल कोसुरकर, प्रवीण बर्डे,मंगेश नन्नावरे आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये