ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानस संस्था अंतर्गत दिवाळी निमित्य मुक्या प्राण्यांना अन्नदान

तसेच वर्धा जिल्हयातील 15 मुक्या प्राण्यांना दत्तक घेवून त्यांचा सर्व सोई व्यवस्था करून पालन पोषण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिवाळी निमित्य वर्धा शहरातील बेवासर मुक्या प्राण्यांना अन्नदान करण्याचा संस्थेचा संकल्प. 

संस्था अंतर्गत वर्धा जिल्हयातील 15 मुक्या प्राण्यांना दत्तक घेवून त्यांचा सर्व सोई व्यवस्था करून पालन पोषण करण्याचा मानस 

 अन्नदान करतांना संस्था अघ्यक्ष तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या यवुती उपजिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा कु. तेजस्वी शांतारामजी पदिले व पदाधिकारी उपस्थित. 

वर्धा: आज मानस संस्थेतील अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या युवती उप जिल्हाध्यक्ष कु. तेजस्वी शांतारामजी पदिले व संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी दिवाळी निमित्य वर्धा शहरातील गणेश नगर बोरगंाव मेघे बजाज चैक रेल्वे स्टेशन  शास्त्री चैक बॅचलर रोड साई मंदिर बस स्थानक इतवारा पटेल चैक सिव्हिल लाईन आर्वी नाका शिवाजी चैक येथील मुक्या प्राण्यांना अन्नदान केले. तसेच संस्था अंतर्गत वर्धा जिल्हयातील 15 मुक्या प्राण्यांना दत्तक घेवून त्यांचा सर्व सोई व्यवस्था करून पालन पोषण करण्याचा मानस करण्यात आला.

आजची स्थिती बघता वर्धा शहरात तसेच वर्धा जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात मुके बेवारस प्राणी आहेत. परंतु त्यांचा साभांळ कोणी करत नसल्यामुळे त्यांना व्यवस्थित अन्न पण मिळत नाही. खुप सारे मुके प्राणी आहेत की ते अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचा जिव गेलेला आहे. बेवारस प्राणी असल्यामुळे त्यांच्याकडे कोणतेही नागरीक लक्ष देत नाही. की त्यांची कुठल्याही प्रकारे मदत करत नाही. सर्व बाबी लक्षात घेवून वर्धा जिल्हयातील मुक्या प्राण्यांना अन्नदान करण्याचा संकल्प मानस संस्थाने घेतला आहे. हा संकल्प संपुर्ण वर्धा जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या युवती उप जिल्हाध्यक्ष कु. तेजस्वी शांतारामजी पदिले सचिव कोषाध्यक्ष व संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

अन्नदान करतांना संस्थेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या युवती उप जिल्हाध्यक्ष कु. तेजस्वी शांतारामजी पदिले सचिव लवकुमार दिलीप नाईक, सहसचिव सागर विजयराव सिरसाट तसेच संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये