गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गावठी मोहा दारूची वाहतुक करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात”

एकूण 3 लाख 92 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दि. 03/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे तीन वेगवेगळ्या ठिकाणी 01 मोपेड व 02 मोटर सायकलवर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, आरोपी हे मोक्कावर मोहा दारूची वाहतुक करतांना मिळुन आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन 1) 19 प्लास्टीक पिशव्यांमध्ये 380 ली. गावठी मोहा दारू कि. 57,380 रू, 2) एक विना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल कि. 1,00,000 रू, 3) एक विना क्रमांकाची पल्सर 220 मोटर सायकल कि. 1,10,000 रू, 4) एक विना क्रमांकाची सुझुकि बर्गमान मोपेड कि 1,25,000 रू असा जु.कि. 3,92,380 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) यश भाष्कर कोल्हे, वय 18 वर्ष, रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट, 2) सोहेल शेख जावेद षेख, वय 19 वर्ष, रा. सेट्रल वार्ड हिंगणघाट, 3) आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे वय 27 वर्ष, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट 4) चेतन महेश वाटमोडे, वय 26 वर्ष, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट, 5) तेजस राजु कांबळे, वय 21 वर्ष, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट 6) जगदिश अमर तेलतुमडे, वय 28 वर्ष, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा 7) आकाश उर्फ लिंबु अमर तेलतुमडे, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट (पसार) यांचेवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये