ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोबाईल दुकानमध्ये चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सदर गुन्ह्यांची हकिकत याप्रमाणे आहे की, फिर्यादी नामे मनिश भिकमचंद लाहोटी रा. जैन मंदिर वार्ड हिंगणघाट यांचे रूबा चौक हिंगणघाट येथे, लाहोटी ब्रदर्स नावाचे मोबाईल दुकान असून दि 22/10/2024 ते दि 23/10/2024 चे रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दुकानाचे शटर्सचे लॉक तोडुन आतमध्ये प्रवेश करून, विवो कंपनीचे एकुण 30 मोबाईल जु.कि. 5,00,000 रू चा माल चोरून नेल्याबाबत, त्यांनी दिलेल्या रिपोर्टवरुन पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्र 1400/2024 कलम 351(4), 305 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा पथक करीत होते, तपास दरम्यान, सदर गुन्ह्यात कार क्र. UP-80/GS-5079 चा वापर झाल्याचे तांत्रिक माहितीवरून निष्पन्न झाल्याने, सदर कार मालकाच्या शोध घेणेकरीता पथक आग्रा उ.प्र. येथे जावुन त्याचा शोध घेतला असता, मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर आरोपी साथीदारांसोबत संगणमताने केल्याचे कबुल केले असुन, सदर गुन्ह्यात त्याचे मालकिची एक WAGON R VXI कार क्र. UP-80/GS-5079 चा वापर केल्याचे व चोरुन नेलेले सर्व मोबाईल त्याचे साथीदारांकडे असल्याचे सांगितले, त्यावरून आरोपी/ कार मालक नामे यशपालसिंग शितलप्रसाद सिंग वय 43 वर्ष, रा. मेहरमपुर तह. फतेहाबाद जि. आग्रा उ.प्र यास ताब्यात घेऊन व गुन्ह्यात वापरलेली एक WAGON R VXI कार क्र. UP-80/GS-5079 कि. 6,00,000 रू चा माल जप्त करून वर्धा येथे परत आले असून, आरोपीचे इतर साथीदार 1) ईरफान बालु हामी खान 2) जाहिद उर्फ ग्यानी जुहुर खान 3) जमशेद आस मोहम्मद सर्व रा. सालाहेकी, पो.स्टे. सदर तह.जि. जुह- हरियाणा यांच्या शोध घेणे सुरू आहे. 01 आरोपी व कार पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्वाधीन करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, आशिष महेशगौरी, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, शुभम राऊत, मुकेश ढोके सायबर सेल चे दिनेश बोथकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये