ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस स्टेशन, स्था.गु.शा. वर्धा, जिल्हा वर्धा, विशयः- पोलीस स्टेशन, पुलगाव येथील मर्ग क्रमांक 98/2024 कलम 194 बिएनएसएस मधील अनोळखी पुरूष जातीचे मृतक इसमाचा शोध घेण्याबाबत

पोलीस स्टेशन पुलगाव जिल्हा – वर्धा, मर्ग क्रमांक

98/2024 कलम 194 बिएनएसएस

फिर्यादी

श्री. विकास रमेश भाले, स्टेशन प्रबंधक दहेगाव गावंडे तर्फे संदिप विनोद मेश्राम, वय 34 वर्ष, रा. थुल ले आऊट, सिंधी मेघे वर्धा, धंदा नौकरी (ट्रॅकमन-3)

मृतकाचे नाव

अनोळखी पुरूष मृतक इसम वय अंदाजे 28 ते 30 वर्ष,

घटनास्थळ : मौजा दहेगाव ते कवठा सेक्षन किमी 742/5-3 रेल्वे अप लाईन

घटना ता. वेळ दिनांक 02/11/2024 चे 06.00 वा. ते 08.30 वा. दर

दाखल ता. वेळ दिनांक 02/11/2024 चे 13.33 वा.

अनोळखी मृतक व्यक्तिचे वर्णन

उंची 5 फुट 8 इंच, बांधा मजबुत, रंग गोरा, केस काळे, चेहरा गोल, डोळे काळे, टपोरे, कपडे अॅडीडाँस कंपनीची काळया रंगाची टि शर्ट, नेव्ही ब्ल्यु रंगाचा फुलपॅन्ट, त्या खाली निळया रंगाचा बरमोडा, उजवे हातावर मध्यभागी स्टार गोंदन असुन डावे हाताचे अंगठयाजवळ इंगजीत L अक्षर गोंदलेले

सदरचे प्रकरण याप्रमाणे आहे की, पोलीस स्टेशन, पुलगाव येथे फिर्यादी नामे श्री. विकास रमेश भाले, स्टेशन प्रबंधक दहेगाव गावंडे तर्फे संदिप विनोद मेश्राम, वय 34 वर्ष, रा. थुल ले आऊट, सिंधी मेघे वर्धा, धंदा नौकरी (ट्रॅकमन-3) यांनी दिनांक 02/11/2024 रोजी लेखी तहरीर दिली की, मौजा दहेगाव ते कवठा सेक्सन किमी 742/5-3 रेल्वे अप लाईन चे बाजुला अनोळखी पुरूष जातीचा मृतक इसम वय अंदाजे 28 ते 30 वर्ष, वयोगटातील मृतावस्थेत मिळुन आल्याचे तहरीरवरून मर्ग क्रमांक 98/2024 कलम 194 बिएनएसएस अन्वये नोंद आहे.

सदर मर्ग मधील मृतक अनोळखी इसमाचा रेल्वे ने कटुन पाय व डोक्याला मार लागल्याने मृत्यु झाला आहे. मृतकचे प्रेत दिनांक 02/11/2024 पासुन दिनांक 04/11/2024 पावेतो ग्रामीण रूग्णालय, पुलगाव येथील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहे. करीता वरील नमुद मृतक अनोळखी इसम हा हरविला असल्याबाबत आपआपले पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्यास पोलीस स्टेशन, पुलगाव येथे खालील नमुद फोन क्रमांकावर संर्पक करावा.

(पोहवा/392 गजानन गहुकर) पोलीस स्टेशन, पुलगाव मो. क्र. 9552517256,

1) पोलीस स्टेशन, पुलगाव 07158-282033

2) पोनि. श्री. आर. जे. सोनवणे – 7020577459 पोलीस स्टेशन, पुलगाव

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये