ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फूटपाथ स्कूल मधील विद्यार्थांना फराळ वाटप 

मोहीत शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा: समाजातील दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने मोहीत शैक्षणिक व सामाजिक संस्था दरवर्षी दिवाळीनिमित्त एक विशेष उपक्रम राबवते. वर्धा येथील आर्वी नाका परिसरात असलेल्या वडार वस्तीतील “फूटपाथ स्कूल” मधील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करून संस्थेने त्यांच्या सणासुदीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक मोहित सहारे आणि श्रेय शर्मा हे इतर सदस्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

दिवाळीचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवणारा ठरला आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ फराळ वाटपापुरता मर्यादित नसून, समाजातील दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देणे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, आणि त्यांच्या जीवनात आनंदाचा छोटासा वाटा देणे हे आहे.

संस्थेच्या वतीने मोहित साहरे यांनी सांगितले की, “दिवाळी ही आनंदाची आणि एकत्रित सण साजरी करण्याची वेळ असते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे अनेक गरजू विद्यार्थी हा आनंद अनुभवू शकत नाहीत. आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात थोडासा आनंदाचा प्रकाश आणायचा आहे.”

फूटपाथ स्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळालेला फराळ आणि संस्थेच्या सदस्यांचे प्रोत्साहन त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करण्यास मदत करते. या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांना एकत्र येऊन गरजूंसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धा विभाग मोहीम प्रमुख प्रतीक पवार,उत्तराताई जांभुळकर बहुउद्देशीय संस्था वर्धा आणि डॉ.बी. टी जांभुळकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.नयन जांभुळकर, वैष्णवी सहारे, अंकित बारंगे, सारंग भुयार, सारंग नेवारे, गजानन जाधव यांचे प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये