ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आरंभ बहुउद्देशीय संस्था तर्फे सेवाश्रम सिंधी मेघे वर्धा येथे दिवाळी सण साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर अंतर्गत दिवाळी सणानिमित्त सामाजिक बांधिलकी राहावी याकरिता आरंभ बहुउद्देशीय संस्था तर्फे सेवाश्रम सिंधी मेघे वर्धा येथे असलेले वृद्धाश्रम व अनाथाश्रम येथे असलेले मुले व मुली व वृद्ध यांच्या सोबत दिनांक 1/11/2024 रोजी 12:45 वाजता ते 14:00 वाजता दरम्यान दिवाळी सण साजरा करण्यात आला आहे.
त्यावेळी पोलीस निरीक्षक श्री पराग पोटे, सपोनि शुभांगी वाजे, सपोनि राम ढगे, अंमलदार व एसएसबीचे सैनिक यांनी अनाथ आश्रमातील मुले मुली व वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांच्या सोबत दिवाळी साजरी केली.