ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भर दिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून आरोपी फरार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तहसिल कार्यालया समोर भर दिवसा एका विवाहित महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेअज्ञात व्यक्ती ने तोडून पळ काढला, सदर घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महीला सौ लक्ष्मी बाई भिमराव कासारे या त्यांचे घरुन मुलीचे घरी पायी जात असतांना तहसिल कार्यालयाचे समोर अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे 10 मनी व 2 डोरले असलेली 5 ग्रम वजनाची किंमती अंदाजे 30000/-रुपये ची पोत तोडुन तेथुन पळुन गेला.

घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये