ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतीच्या वादातून पती पत्नीला मारहाण 

चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तालुक्यांतील मेहुनाराजा शिवारात शेतीच्या वादातून पती पत्नी ला मारहाण केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना 29 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शितल समाधान काकडे रा दगडवाडी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाइक असुन फिर्यादी व तिचे पती हे दोघे घरी हजर असताना आरोपी भगवान् नामदेव काकडे, पानकोर बाजीराव काकडे, राजु बाजीराव काकडे, आम्रपाली राजु काकडे यांनी शेतीचे कारणावरून संगणमत करून फिर्यादी व त्यांचे पतीस अश्लिल शिवीगाळ करून महिलेचे केस ओढून तिला खाली पाडुन,तिला व तिचे पतीस चापटबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये