माजी आमदार ऍडवोकेट संजय धोटे बंडाच्या तयारीत.
दिवाळीच्या पर्वावर राजुरा विधानसभेत भाजपामध्ये राजकीय धमाका.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये राजुरा विधानसभा करिता देवराव भोंगळे यांची उमेदवारी जाहीर होताच माजी एडवोकेट संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. उमेदवारीसाठी स्पर्धेत माजी आमदार एडवोकेट संजय धोटे व सुदर्शन निमकर हेही इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे एडवोकेट संजय धोटे व सुदर्शन निमकर यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषदेत देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपा अन्तर्गत कलह चव्हाट्यावर आलेला आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे माजी आमदार एडवोकेट संजय धोटे बंड करण्याच्या तयारीत आहेत आणि ते आज दिनांक 28 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत .एन दिवाळीच्या पर्वावर विधानसभा क्षेत्रात भाजपा अंतर्गत राजकीय धमाका झाल्यामुळे वातावरण ढवळून निघालेले आहे.
राजुरा विधानसभा उमेदवारीसाठी एडवोकेट संजय धोटे ,देवराव भोंगडे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या रस्सीखेच होती. दिनांक 26 ऑक्टोबरला देवराव भोंगळे यांची उमेदवारी जाहीर होताच विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या. चारही तालुक्यातील एडवोकेट संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीला प्रचंड विरोध केला. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भाजपा वरिष्ठांना कार्यकर्त्यांच्या भावना कळवण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले. पत्रकार परिषदेला चारही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. एडवोकेट संजय धोटे यांनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याची मागणी केली. अन्यथा कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले. यामुळे राजुरा विधानसभेतील भाजपा सरळ दोन गटात विभागल्या गेली आहेत. या राजकीय भूकंपामुळे भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. देवराव भोंगळे यांच्या अडचणी मध्ये वाढ झालेली आहे.
विधानसभेचे उमेदवारी बदलण्यासाठी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यासाठी एडवोकेट धोटे व निमकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या भेटीला जात असल्याची माहिती दिली. देवराव भोंगळे यांनी स्थानिक वरिष्ठ नेत्यांना कार्यक्रमातून सतत डावलून कमी लेखण्याचा आरोप ही पत्रकार परिषदेत केला अशा अहंकारी व गर्विष्ठ व्यक्तीला उमेदवारी देऊ नये ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे त्यामूळे देवराव भोंगळे यांची उमेदवारी रद्द न झाल्यास एडवोकेट संजय धोटे यांचे बंडांचे आवाहन भाजपा समोर उभे ठाकणार आहे.म
उमेदवारी रद्द न झाल्यास माजी आमदार एडवोकेट संजय धोटे व सुदर्शन निमकर हे दोघेही भोंगळे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहणार आहेत. समोरच्या रणनीतीबाबत “वेट एन वॉच ” असा सूचक इशारा एडवोकेट संजय धोटे यांनी पत्रकारांना दिला. एन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधील अंतर्गत कलह बाहेर आल्यामुळे कार्यकर्त्यांसमोर मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारणी सदस्य खुशाल बोंडे, अरुण मस्की, सुरेश केंद्रे, अबिद अली ,निलेश ताजने यांची उपस्थिती होती.