ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याचा जल्लोष

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : शहरात देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याचा जल्लोष शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रासमोर साजरा करण्यात आला.

राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांना पहिल्यांदा राजुरा विधानसभेची उमेदवारी शनिवारला जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रासमोर फटाक्यांची अतिषबाजी आणि एकमेकांना पेढा भरवून जल्लोष केला.

भाजपाने त्यांना पहिल्यांदा राजुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली त्यासाठी हा जल्लोष करण्यात आला.

यावेळी भाजपाचे निरीक्षण तांड्रा, माजी सभापती नितु चौधरी, अमोल थेरे, संतोष नुने, गणेश कुटेमाटे, साजन गोहने, सिनू इसारप, वैशाली ढवस, सुचिता लुटे, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, अमीना बेगम, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, रत्नेश सिंग, अनिल मंत्रिवार, तुलसीदास ढवस, चिन्नाजी नलभोगा, मिलिंद पानघाटे, सुनील बाम, हेमंत पाझारे, बबलू सातपुते, सचिन कोंडावार, ऑटो संघटना अध्यक्ष श्रीनिवास सुद्दाला, मानस सिंग, इर्शाद कुरेशी, सतीश बोन्डे, सुरेंद्र जोगी, श्रीकांत सावे, मारोती मांढरे, धनराज पारखी, सुरेंद्र झाडे, रवी चुने, स्वामी जनगम व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये