ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात चोरट्याचा सोयाबीन वर डल्ला    

एक लाखाचे सोयाबीन केले लंपास ; गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     सोयाबीन पिकाची काढणीनंतर शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेले 22 क्विंटल (किंमत एक लाख पाच हजार सहाशे रुपये)अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जालना रोडवरील हॉटेल चैत्र बन च्या बाजूला असलेल्या शेतामध्ये घडली याप्रकरणी दिनांक 26 ला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा जालना रोडवर हॉटेल चैत्रबन च्या बाजूला राम विजय भालचंद्र नरोडे राहणार मानसिंगपूर देऊळगाव राजा यांचे शेत आहे शेतामध्ये असलेले सोयाबीन पिकाची काढणीनंतर थ्रेशर मधून काढून त्यांनी शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये साठवलेले होते अज्ञात चोरट्याने दिनांक दिनांक 25 च्या मध्यरात्रीला सदर पत्र्याचे शेड तोडून तेथे साठवलेले एकूण 41 पोते सोयाबीन म्हणजेच 22 क्विंटल किंमत एक लाख पाच हजार सहाशे अज्ञात चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी फिर्यादी राम विजय भालचंद्र नरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये