ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटले

दहा जखमी ; देऊळगाव राजा येथील जाफराबाद चौफुलीवरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहराबाहेरील असलेल्या बायपास मार्गावरील जाफराबाद चौफुलीवर शुक्रवारी रात्री लग्नाच्या रिसेप्शनला जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली. त्यात आठ महिला, एक चिमुकलीसह दहा जण जखमी झाले. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथून वऱ्हाडी मंडळी लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देऊळगाव मही येथे एका जीपने येत होते. चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालविल्याने देऊळगाव राजा येथील बायपास मार्गावरील धोकादायक जाफराबाद चौफुलीच्या वळणावर चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीप पलटी होऊन अपघात घडला. सदर अपघातात आरेफा बेगम शेख सैईद (वय ३५), राहिला शेख इस्तियाक (२०), आलिशान शेख इलियास (४५), मदिया शेख नबीन (१०), रफिया परवीन (४५), रिजवाना बेगम शेख मोहम्मद (२९), आसिफा शेख शाहिद (४) , नाझिया शेख नबीन (३४), नजमा मोहम्मद वाजेद (२७), सर्व रा. छत्रपती संभाजीनगर व शेख अजीज शेख हमजा (५८) रा. देऊळगाव मही जखमी झाले. अपघातातील गंभीर जखमींना संभाजीनगर येथे हलविण्यात आतर किरकोळ जखमी प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अक्षय गुट्टे व पारिचारिका यांनी प्रथमोपचार केले. अपघात घडल्यानंतर चालकाने वाहन सोडून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त जखमींना ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्यास मदत केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये