ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवशाही बसवर पिकअप वाहन धडकले बसचे नुकसान

गुन्हा दाखल   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहराबाहेरील बायपास वर कुंभारी येथे शिवशाही बस जात असताना महिंद्रा पिकअप च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून शिवशाही बसला धडक दिली यामध्ये बसचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याप्रकरणी पिकअप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना दिनांक 25 ला दुपारी घडली सविस्तर वृत्त असे की शिवशाही बस चालक फिर्यादी रमेश प्रकाश पैठणे, चिखली आगार हे त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस क्रमांक एम एच 09-EM 17 75 देऊळगाव राजा शहरातील बायपास वरून मार्गस्थ होत असताना कुंभारी बायपास वर हॉटेल कांचन समोर महेंद्रा पिक अप क्रं MH-28-BB-3679 ज्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून विरुद्ध दिशेने येऊन शिवशाही बसला धडक दिली.

यामध्ये बस ते दहा हजाराचे नुकसान झाले आहे नुकसानीस तसेच अपघातास कारणीभूत असलेल्या पिकअप चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये