गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती बसस्थानकातून मोबाईल व दोन हजार रुपये लांबविले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  भद्रावती बसस्थानकावरून चंद्रपूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल व खिशातील दोन हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबवण्याची घटना दिनांक 25 रोज शुक्रवारला घडली. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शहरातील कुंभार मोहल्यातील रहिवासी असलेले गणेश वाणी हे आपल्या पत्नीसह भद्रावती बस स्थानकावरून चंद्रपूर येथील हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांचा ओपो कंपनीचा अंदाजे किंमत 15000 रुपये मोबाईल व खिशातील दोन हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविले.

सदर घटनेची तक्रार गणेश वाणी यांनी भद्रावती पोलिसात केली असून भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते अज्ञात चोट्याच्या शोधात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये