ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन जायंट्स सप्ताह साजरा

जायंटस ग्रुप ऑफ देऊळगाव राजाचे वतीने 200 नागरिकांनी भरून दिले नेत्रदान संकल्प पत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संपूर्ण भारतात व भारताच्या बाहेर जायंटस वेल्फेअर फाउंडेशन च्या शाखा आहेत त्या त्या सर्व शाखेतून गेल्या 52 वर्षाची परंपरा कायम ठेवत दिनांक 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत जायंटस सप्ताह साजरा करण्यात आला, देऊळगाव राजा ग्रुपच्या वतीने सुद्धा विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन जायंटस सप्ताह साजरा केला यामध्ये मुख्य आकर्षक ठरले ते मरणोत्तर नेत्रदान संकल्पपत्र भरून घेण्याचे ,या अभियानात 200 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म भरून दिले आहे.

  जायंटस ग्रुप ऑफ देऊळगाव राजाचे वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेऊन जायंटस सप्ताह साजरा करण्यात आला दिनांक 17 सप्टेंबर रोजी श्री गुगुळा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रदीप मिनासे उपस्थित होते तर जायंटस तर्फे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून कल्याण चांडगे यांनी काम पाहिले. दिनांक 18 सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांना माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे यांच्या हस्ते शालेय ड्रेसचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रॉजेक्ट चेअरमन म्हणून श्याम गुजर यांनी काम पाहिले 19 सप्टेंबर रोजी मरणोत्तर नेत्रदान संकल्पपत्र डॉक्टर अशोक काबरा यांचे प्रमुख उपस्थितीत भरून घेण्यात आले या प्रकल्पाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून संजय डोंनगावकर यांनी काम पाहिले. 20 सप्टेंबर रोजी हिंदू स्मशानभूमी व बौद्ध स्टेशन भूमीमध्ये मरणोत्तर नेत्रदान विषयी जनजागृतीसाठी फ्लेक्स बॅनर लावण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून दादा जम्मन व्यवहारे उपस्थित होते तर प्रॉजेक्ट चेअरमन म्हणून संजय सराफ यांनी काम पाहिले.

21 सप्टेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी वाहन चालवताना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून रऊफ भाई यांनी सखोल मार्गदर्शन केले तर प्रोजेक्ट चेअरमन म्हणून मनीष काबरा यांनी काम पाहिले. 22 सप्टेंबर रोजी श्री संत नरहरीनाथ महाराज पैठणकर मठात उपस्थित विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून या संस्थांचे मोहननाथ महाराज पैठणकर उपस्थित होते तर प्रॉजेक्ट चेअरमन म्हणून राजकुमार भन्साळी यांनी काम पाहिले.

सांगता समारोह च्या दिवशी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर वैभव वायाळ यांच्या हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिरात 150 रुग्णांची मोफत हाडांची ठीसुळता तपासणी करून घेण्यात आली व मोफत सल्ला देण्यात आला त्याचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून सन्मतीजैन यांनी काम पाहिले संपूर्ण सप्ताहात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम यशस्वीतेसाठी जायंटसचे पुरुषोत्तम धन्नावत, जुगल किशोर हरकुट,सन्मती जैन,कल्याण चांडगे, श्याम गुजर, संजय डोणगावकर, राजकुमार भन्साळी,मनीष काबरा, डॉ. रामदास शिंदे, डी.के.राठी, डॉ गणेश मांटे, किशोर आंबुसकर, राजेश तायडे, बाळू मिनासे, संदीप जांभोरकर यांनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये