ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदिरा गांधी विद्यालयाचा कौतुकास्पद उपक्रम

कोरोना काळातील अपूर्ण अभ्यासक्रम केला पूर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सहाय्यक शिक्षक दिलीप आगळे यांचे सर्वत्र कौतुक

 शैक्षणिक सत्र २०१९- २० मध्ये संपूर्ण भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि संपूर्ण भारतातील शाळा,महाविद्यालये बंद करण्यात आले.त्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले.परंतु इंदिरा गांधी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक दिलीप आगळे यांनी लॉकडाऊन च्या काळात जो विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला तो पूर्ण करणे व विद्यार्थ्यांचे मनात अभ्यासाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ९ वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वर्ग पाच ते आठवीचे क्रमिक पाठ्यपुस्तक परत विद्यार्थ्याकडून अभ्यास करवून घेतला. न समजलेला भाग वअपूर्ण राहिलेला भागाची पूर्णतः उजळणी करण्यात आली.विद्यार्थी स्वयंम स्वयंप्रेरित होऊन वाचन करू लागले.त्यांच्या वाचनात गती निर्माण झाली व स्वयंप्रेरणेने अभ्यास करू लागले.विद्यार्थी गटागटात घरी अभ्यास करताना आढळले. विद्यार्थी उपस्थिती 100% झाली व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली.विद्यार्थ्यामध्ये अभ्यास विषयक झालेल्या बदलामुळे पालकांना सुद्धा खूप आनंद झाला व त्यांनी समाधान व्यक्त केले.

सदर विद्यार्थी केंद्रित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला त्यांच्या मध्ये इंग्रजी विषयाचे वाचन, लेखन,श्रवण,भाषण व संभाषण इत्यादी कौशल्य विकसित झाले तसेच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण होऊन स्वयं प्रेरणेने विद्यार्थी अभ्यास करायला प्रेरित झाले सदर उपक्रमामुळे पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशा प्रकारे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दिलीप आगळे ( इंग्रजी विषय शिक्षक) तथा जिल्हा व राज्यस्तरीय मार्गदर्शक आहेत व ते नेहमीच नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबवित असतात. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक लोखंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या विशेष उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण केली त्याबद्दल सर्व स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये