ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावरग्रीड, देवळी येथे सायबर जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

दि. 23.10.2024 रोजी देवळी तालुक्यातील पावरग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडीया लिमीटेड, वर्धा येथिल अधिकारी व कर्मचारी यांना सायबर गुन्हयांबाबत मार्गदर्शन करणे करिता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

मा. श्री अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा व मा. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीरामध्ये सायबर शाखेतील सपोनि श्री. सुमंतराज भुजबळ, मपोशि स्मिता महाजन, व टिम यांनी मोबाईल, फेसबुक, व्हॉटसअप व इतर सोशल मिडीसाचे गैरवापर रोखण्याकरिता व सायबर जगात स्वतःला सुरक्षित ठेवणे संबंधाने माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करून इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. गुन्हा होण्यापुर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.

सदर कार्यक्रमास पावरग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडीया लिमीटेड, वर्धा येथिल उप महा-व्यवस्थापक श्री एस व्ही कोलटे, व्यवस्थापक श्री संपत आणि अभियंता श्री चक्रधर व इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये