ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन देवळी येथील अधिकारी व पोलीस अंमलदार ह्यांनी दुरक्षेत्र वायगाव निपाणी अंतर्गत आजगाव शेत शिवारात राबवीली वाँश आउट मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         पोलीस स्टेशन देवळी येथील ठाणेदार मा.श्री. रविंन्द्र शिंदे व अधिनस्थ पोलीस अंमलदार ह्यांनी दुरक्षेत्र वायगाव निपाणी अंतर्गत सद्या सुरु असलेली आदर्श आचार संहीता व आगामी होणा-य़ा विधानसभा निवडणुक ही शांततेत पार पडावी. ह्या अनुषंगाने आजगाव शेत शिवारात वाँश आउट मोहीम राबवीली असता,मोहीमे दरम्याण आजगाव शेत शिवारा लगत असलेल्या झुडपी शिवारात झुडपात लपवुन असलेले व जमीनीत गाढुन असलेले एकुन 17 लोखंडी ड्रम मध्ये अंदाजे 1000 लि कच्चा मोहा रसायण सडवा कि.100000/रु व 17 लोखंडी ड्रम कि.8500/-रु असा एकुन जुमला किं.01,08,500/-रु चा माल मिळुन आल्याने संपुर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन जागीच नाश करण्यात आला.तसेच कच्चा मोहा रसायण सडवा तयार करीत असतांनी मौक्यावर मिळुन आलेले आरोपी नामे-01) श्रीमती.सिमा विनायक कांबळे वय 45 वर्ष 02) शंकर रमेश कांबळे वय 37 वर्ष दो.रा.मौजा वायगाव निपाणी ह्य़ांचेवर कलम 65(फ),83 म.दा.का प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

          सदर ची कार्यवाही मा.राहुल चव्हाण सहा.पोलीस अधिक्षक,उप.विभाग पुलगाव ह्यांचे मार्गदर्शनात देवळी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्री.रविंन्द्र शिंदे पो.हवा. कुणाल हिवसे,नितीन तोडासे.पो.ना.स्वप्नील वाटकर, अमोल आलवाडकर.पो.काँ.मनोज नप्ते,नितेश पाटील.धर्मेंन्द्र गिरी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये