अभिनंदन… Mspc च्या वतीने विशेष सन्मानाचे मानकरी जाहिर!

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल {MSPC} ने उत्कृष्ट जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करणाऱ्या संस्थांना मा. श्री. आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून यांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमला नागपूर झोन मधून मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.
सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट फार्मा डे साजरा करण्यासाठी चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन लवकरच विभागनिहाय सन्मानित करण्यात येईल. असे चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमचे अध्यक्ष गणेश झाडे उपाध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले, सचिव पंकज देशमुख, सहसचिव तुषार सांबरे सर, सचिन खोब्रागडे, सागर मंडल, कोषाध्यक्ष रामटेके यांनी माहिती दिली आहे.
तर्फे सर्व फार्मासिस्ट फोरम टीमचे अभिनंदन…