ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे भारतरत्न डॉ. कलाम यांची 93 वी जयंती उत्साहात साजरी

एक शाम डॉ. कलाम साहेब के नाम तथा महाप्रसादाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अतस्व समिती व ऑल इंडिया कौमी तंजीम यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांची ९३ वी जयंती येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.कलाम जयंती व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून महाप्रसाद वितरण व देशभक्ती पर गीतांचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, डॉ. ‌एपीजे अब्दुल कलाम अतस्व समिती व ऑल इंडिया कौमी तंजीमचे अध्यक्ष जैरूद्दीन छोटुभाई शेख, लक्ष्मणराव पराते, राजेंद्र चिकटे, विलास परचाके, प्रवीण खेडकर, शाम लेडे, रहमत बाबा, अनिल काळे, साहेबराव ठाकरे, सुनील गायकवाड, दशरथ शेंडे, शेषराव भोई, रशीद शेख, प्रवीण सुराणा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

      डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना छोटूभाऊ शेख म्हणाले की, डॉ. कलाम हे एक भारतीय शास्त्रज्ञ होते. ज्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली होती. २००२ त२००७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीमुळे आणि लोकप्रियतेमुळे त्यांना “मिसाईल मॅन” आणि ” पीपल्स प्रेसिडेंट” अशी उपाधी मिळाली. डॉ. कलाम यांनी सर्वधर्मसमभाव वृत्तीने मानवतेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा कशी करता येईल याचा नेहमी विचार केला. ते इतर लोकांनाही मानवतेची प्रेरणा देत असत. हे मानवतावादी वर्तन डॉ. कलाम यांना नम्र व्यक्तिमत्व बनवते. शैक्षणिक काळात त्यांनी वर्तमानपत्र सुद्धा वाटली. एक नावाड्याचा मुलगा ते यशस्वी शास्त्रज्ञ त्यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.

 यावेळी इतर मान्यवरांनी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम याच्या जीवनावर प्रकाश टाकला. डॉ.कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून पेपर विक्रेते, पेपर वाटणारी मुले, पत्रकार, विविध धर्मातील धर्म प्रचारकव मार्गदर्शक भंन्ते, फादर, मौलवी, गुरूदेव सेवा मंडळांचे सेवा अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी व गणमान्य व्यक्तिचा यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

     सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्यातील चित्रावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सायंकाळी “एक शाम डॉ. कलाम साहब के नाम” तथा भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गुरूदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी लक्ष्मणराव गमे, विनोद खोब्रागडे, राजेंद्र मर्दाने, प्रदीप कोहपरे , उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सहा. एस.एन. येडे, दीपक खडसाने, अन्य कर्मचारी वृंद इत्यादींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. कलाम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयंत आंबेकर, राजेंद्र मर्दाने, प्रदीप कोहपरे, आशिष घुमे व समाजातील प्रमुख व्यक्तींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उल्लेखनीय योगदान बद्दल गायक कलाकार रहमत बाबा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया कौमी तंजीम व ए.पी.जे. अब्दुल कलाम उत्सव समितीचे अध्यक्ष शेख जैरूद्दीन छोटूभाई त्यांचे सहकारी आदींनी अथक परिश्रम घेतले.

      यावेळी हजोरो लोकांनीं महाप्रसादाचा लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये