ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 मध्ये नागपूर विभागात पटकाविले प्रथम पारितोषिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमाअंतर्गत सन 2024-25 मध्ये नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरीने नागपूर विभागातून खाजगी व्यवस्थापनाच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या उपक्रमाचा गौरव सोहळा व पारितोषिक वितरण सोहळा मुंबई येथील एन.सी.पी.ए. च्या भव्य सोहळ्यात सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तथा शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर तथा शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा शिक्षक यांनी विद्यालयाच्या वतीने गौरव चिन्ह आणि 21 लाख रुपयाचे पारितोषिक सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते स्वीकार केले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय ब्रह्मपुरी येथील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेऊन दिवस-रात्र मेहनत करून अनेक उपक्रम पार पाडले. विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता जे जे उपक्रम हाती घेता येतील तेथे उपक्रम या शाळेमध्ये पार पाडले जातात. तसेच डिजिटल शाळा,अद्ययावत साधनसामग्री उपलब्ध ,भव्य प्रांगण तथा भव्य पुस्तक,सायन्स लायब्ररी, बोलक्या भिंती, प्रोजेक्टर, वृक्षवल्ली, परसबाग, स्वच्छता, इत्यादी बाबींमध्ये शाळा विभागातून सरस ठरली. ही शाळा खाजगी व्यवस्थापनाची शाळा असून ब्रह्मपुरी तालुक्यातील मुलांची सर्वात मोठी शाळा आहे या शाळेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील तळागळातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात एकूण 1550 विद्यार्थी शाळेमध्ये विद्यार्जन करत आहेत.

शाळेमध्ये गुणवत्तेला जास्त भर दिला जावा याकरिता शाळेचे सचिव मा.अशोकजी भैय्या यांच नियमित पाठपुरावा असतो. तसेच संपूर्ण कार्याची तंतोतंत अंमलबजावणी शाळेचे मुख्याध्यापक श्री के.एम. नाईक सर व त्यांना सहकार्य मा. पर्यवेक्षक श्री नाकाडे सर करत असतात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत अनेक लोकांचे सहकार्य लाभले त्यामध्ये संस्थेचे सचिव मा. अशोकजी भैय्या, ब्रह्मपुरी चे गटशिक्षणाधिकारी श्री लाडे साहेब, चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी कु. निकिता ठाकरे, तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री के. एम.नाईक सर, पर्यवेक्षक श्री नाकाडे सर, शाळेतील शिक्षकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या सहकार्याने जिद्द व चिकाटीने वरील यश प्राप्त झाले. नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक मुलांची शाळा विभागात सरस ठरली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये