ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त अनोखा उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधुन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील प्रत्येक शिक्षकानी शाळेला एक पुस्तक भेट दिले. तसेच प्रा. आशीष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तीक ग्रंथसंपदेतील एकूण शंभर पुस्तके शाळेला भेट म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांच्या स्वाधीन केली.

या प्रसंगी डॉ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे विध्यार्थ्याकरवी वाचन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये