कायदा हातात घेउन गैरवर्तणूक केल्यास होणार कठोर कारवाई
अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी

चांदा ब्लास्ट. प्रा. अशोक डोईफोडे
तीर्थक्षेत्र देऊळगाव राजा येथे आगामी काळात होणारे दसरा, पालखी, व श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव तसेच देवी विसर्जन निमित्ताने शहर व परिसरात उत्सवाचे अनुषंगाने सामाजिक एकोपा अबाधित राहील याकरीता पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये शहर व परिसरातील हिंदु, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार, यांची शांतता समितीची बैठक पोलिस ठाण्यात,8 ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आली.
सदर सभेमध्ये देऊळगाव राजा शहरातील व परिसरातील सध्याची परिस्थिती व आगामी दसरा पालखी सोहळा व श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव निमित्ताने शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करून कोणी वागल्यास व कायदा हातात घेउन गैरवर्तणूक केल्यास त्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये घडलेल्या अवर्तनिय घटनांमुळे शहरातील वातावरणामध्ये जातीय तणाव निर्माण झाल्याचे दिसुन आले आहे, अशा घटना वारंवार शहरामध्ये किवा परिसरामध्ये घडू नये यासाठी आपसामध्ये सौदर्हाचे वातावरण राहावे तसेच हिंदु मुस्लिम वाद परत होऊ नये, एकोपा अबाधित रहावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली व कायदेशीर मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या तसेच आगामी काळात होणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे म्हणुन शांततेचे आवाहन करण्यात आले. सदर शांतता समितीच्या बैठकीत 70 ते 80 नागरिक उपस्थित होते.



