गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मालगुजारीपूरा, वर्धा येथुन मोपेड गाडी व मोटर सायकल चोरणारा आरोपी गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नमुद घटना ता वेळी व स्थळी यातील नमुद फिर्यादी नामे मधुकर बेलसरे वय 60 वर्षे रा. मालगुजारीपूरा वर्धा. यांनी त्यांची एक ग्रे रंगाची अॅक्टीवा कंपनीची मोपेड जिचा क्र. MH-32, AA- 2266 किंमत 20,000/-रु. ची मालगुजारीपूरा वर्धा. येथुन हि दिनांक 24/09/2024 रोजी ते दिनांक 25/09/2024 चे रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 1539/2024 कलम 303 (2) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर मिळालेल्या माहीती वरुन आज दिनांक 10/10/2024 रोजी आरोपी नामे दिनेश ऊर्फ काल्या लक्ष्मण कुराडे वय 19 वर्षे रा. गिट्टीखदान, बोरगाव मेघे, वर्धा. यास ताब्यात घेवुन पंचा समक्ष सदर गुन्हयातील 1) मोपेड गाडी क्र.MH-32 AA 2266 किंमत 20,000/-रू. 2) एक काळ्या रंगाची फॅशन प्रो हिरो कंपनीची मोटारसायकल गाडी क्र. MH-32 V- 6130 किंमत अंदाजे 45,000/-रू. ही सुद्धा मोटार सायकल गोंटप्लॉट वर्धा येथुन चोरली आहे. अशी कबुली दोन पंचा जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पो.नि. पराग पोटे, स.पो.नी. विकास गायकवाड, यांचे निर्दशनानुसार पो.स्टे. वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. राजेश राठोड ब.क्र.879, पो. अंमलदार सुरज जाधव ब.क्र.1586, संभाजी मुंडकर ब.क्र.1649, अशफाक शेख ब.नं. 1600 यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये