ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात रस्ते ‘अपघाताच्या संख्येत १७ टक्के व मृत्युच्या संख्येत २९ टक्क्याने’ घट

जिल्हाधिकाऱ्यांकडून रस्ता सुरक्षा समितीचा आढावा

चांदा ब्लास्ट 

दरवर्षी रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात नागरिकांना जीव गमवावा लागतो. जिल्ह्यातील अपघातांची संख्या व त्यात होणाऱ्या मृत्युची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे गठन Formation of District Road Safety Committee करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्या पाच महिन्यात (जानेवारी ते मे २०२३) जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत १७ टक्क्याने तर मृत्यूंच्या संख्येत २९ टक्क्याने घट In the district, the number of accidents decreased by 17 percent and the number of deaths by 29 percent झाली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा Collector Vinay Gowda यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत Road Safety Committee Meeting सदर माहिती देण्यात आली. याबाबत जिल्हाधिका-यांनी पोलिस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग व सा.बा. विभागाचे तसेच नियमांचे पालन करणा-या नागरिकांचेही कौतुक केले आहे.
सन २०२२ मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यात जिल्ह्यात ४१५ अपघात झाले होते. तर यावर्षी अपघातांची संख्या ३५५ आहे. अपघाताच्या संख्येत १७ टक्क्यांची घट झाली आहे. २०२२ मध्ये याच कालावधीत २१८ जणांचा मृत्यु झाला होता. २०२३ मध्ये मृत्युचा आकडा १५४ आहे. मृत्युच्या संख्येत २९ टक्के घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत ६४ लोकांचे जीव वाचले आहेत. तसेच जानेवारी ते मे या कालावधीत २०२२ मध्ये ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या २१६ केसेस करण्यात आल्या होत्या. २०२३ मध्ये या केसेसची संख्या ३८१७ (१६०० टक्के वाढ) वर गेली आहे. २०२२ मध्ये सिटबेल्ट न लावल्याबद्दल ४६०८ केसेस, २०२३ मध्ये ही संख्या १०२७६ वर (१२३ टक्के वाढ), गतवर्षी हेल्मेट न घालणे ७०९९ केसेस, २०२३ मध्ये १५६६८ केसेस (१२० टक्के वाढ) तसेच २०२२ मध्ये एकूण मोटर वाहन केसेसची संख्या ४१०७६ होती. तर यावर्षी पहिल्या पाच महिन्यात ही संख्या ५६५५६ वर (३७.६८ टक्के वाढ) वर गेली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. शाळा – महाविद्यालयात विशेष सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा कायद्याबाबत माहिती द्यावी. आपल्या क्षेत्रात अपघात झाला असेल तर पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांसोबतच संबंधित सा.बा. विभागाच्या उपअभियंत्याने अपघातस्थळी जाणे आवश्यक आहे. शहरात ट्राफिक पार्क Traffic Park करीता जागा निश्चित करावी. रस्त्यालगत होणा-या अनधिकृत पार्किंगबाबत संबंधित विभागाने कडक कारवाई करावी. तसेच जिल्ह्यात अपघाताचे ब्लॅकस्पॉट निश्चित करून संयुक्त सर्व्हेक्षण करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
वीस कलमी सभागृहात बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस निरीक्षक रोशन यादव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, डॉ. अविष्कार खंडाते यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व नगर परिषद / नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
#Roads in the district have reduced by 17 percent in the number of accidents and 29 percent in the number of deaths
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये