ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात १० वी १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
पंचायत समिती, कोरपणा अंतर्गत महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 14 जून ला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिक स्मिता चिताडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पंढरी मुसळे, उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे व प्रमुख मार्गदर्शक उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहुरे तसेच अविरतचे तज्ञ मार्गदर्शक श्री प्रशांत धाबेकर होते. कार्यक्रमात विविध शाळांचे २५ विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.